अंजनगाव सुर्जी, दिंनाक १२
(तालुका प्रतिनिधी)
अखिल बारी समाज सर्व शाखिय महासंघ व विठ्ठल मंदिर ट्रस्ट संचालक तसेच बारी समाजातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा विठ्ठल मंदिर अंजनगाव सुर्जी येथे माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.
सभेला प्रमुख अतिथी श्रीकृष्ण टोंगसे पाटील, संचालक टोंगसे बिल्डकॉन, मनोहर सुने अध्यक्ष बारी सर्व शाखिय महासंघ, नेमाडे महाराज,सुरेखा दामेधर उपाध्यक्ष बारी महासंघ, राजेंद्र याऊल माजी सभापती,दीपक बोडखे सामाजिक कार्यकर्ता, नीलिमा निमकर महिला संघटक, उपस्थित होते.
बारी समाजाचा सर्वांगीण विकास होण्याकरीता समाजाचे नेते अनेक राजकीय पक्षात कार्यरत आहे. राजकीय पक्ष त्यांचा वापर करून घेत आहे. समाजातील नेत्यांमध्ये भांडणे लावण्याचे कामही राजकीय पक्ष करीत आहे. याकरिता राजकीय पक्ष भेद समाजाकरिता विसरून संत रुपलाल महाराजचे राष्ट्रीय स्मारक त्यांची कार्यभूमी असलेल्या अंजनगाव सुर्जी तच व्हावे इतरत्र होऊ नये. याकरिता समाजामध्ये जागृती निर्माण करावी असे ठरविण्यात आले आहे. बारी समाजातील काही शीर्षस्थ नेते हेकेखोर पना करीत असल्यास सर्वांनी समन्वय ठेवून कार्य करावे असेही ठरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्मारकांचे आर्किटेक्चर श्रीकृष्ण टोंगसे यांनी स्मारकांची चित्रफित उपस्थिताना व्हिडिओ क्लिप द्वारे सांगितली आहे.
संत रुपलाल महाराज बारी समाजाचे दैवत असून त्यांचे कार्य सर्व समाजाभिमुख असल्याने बारी समाजातील पोट जाती संपूर्ण देशामध्ये सूर्यवंशी ,बरई, कुमावत, वर्मा, तांबोळी, चौरसिया, गोलाईत आहे. बारी समाजाचे सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संत रुपलाल महाराज आर्थिक महामंडळ घोषित केले होते. घोषित केलेले महामंडळ उप कंपनी असल्यामुळे समाजाचे महामंडळाला स्वतंत्र दर्जा देण्यात यावा अशी ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने बारी समाजाला न्याय न दिल्यास आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. सभेला बारी महासंघाचे केंद्रीय पदाधिकारी संदीप सुने, विलास दामेधर , सुधाकर टिपरे, प्रवीण याउल,राज्य पदाधिकारी प्रमोद कुऱ्हाडे, सुधीर बदुकले ,किशोर याऊल, निलेश अस्वार,प्रा.राजस, निलेश ढगे, दिनेश बोंडे,बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे व्यवस्थापन मनोहर भावे, संचालन सुभाष थोरात व आभार प्रदर्शन मुरकुटे गुरुजी यांनी केले आहे.

