बालगृहातील तीन मुलींच्या कुटुंबाचा शोध

 

 

अमरावती, दि.९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  येथील शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल झालेल्या मोना,अनामिका आणि सोनी अकील यादव यांना भेटण्याकरिता आजपर्यंत त्यांचे आई -वडिल व नातेवाईक आलेले नाहीत. मुलींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबियांचा शोध सुरु असल्याचे बालगृहाच्या अधिक्षकांनी कळविले आहे.

 

            नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत १२ ऑगस्ट २०२६ रोजी मोना ही बालिका,भातकुली पोलीस  स्टेशन


मार्फत ४ सप्टेंबर २०२५ रोजी अनामिका ही बालिका तर अमरावती रेल्वे पोलिसांमार्फत  १४ ऑगस्ट २०२६ रोजी सोनी अकील यादव ही बालिका बाल कल्याण समितीच्या आदेशाने शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल झाल्या आहेत. मोना  ही बालिका दामिनी पथकाला नांदगाव पेठ जवळील मंदिरात आढळून आली.तिचे वय साधारणत: १६ ते १८ वर्षा दरम्यान  असून उंची १४४ सेमी तर वजन ३६ किलो ,वर्ण सावळा आहे.

 


अनामिकाही ही माईल्ड मतिमंद असून तिचे वय १२ ते १६ वर्षा दरम्यान आहे. तिचे वजन १५ किलो,उंची १३५ सेमी आणि वर्ण सावळा आहे. ती फक्त तुरळक हिंदी शद्ब बोलते.सद्य: स्थितीत तिला मोझरी येथील मतीमंदाच्या शाळेत पाठविण्यात आले आहे.बालिकेच्या कुटुंबियांचा शोध घेण्याबाबत भातकुली पोलीस स्टेशनला कळविण्यात आले आहे.

 


सोनी अकील यादव ही बालिका जबलपूर रेल्वे मध्ये एकटी भटकतांना आढळल्याने तीला अमरावती रेल्वे पोलिसांमार्फत बालगृहात दाखल करण्यात आले. सोनीचे वडील रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे तर आई सोडून गेल्याचे ती सांगते. गावाचे नाव उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील कुडीयागाव वस्का बाजार तर जवळच्या पोलीस स्टेशनचे नाव इटावा सांगते. बालीकेचे २९ सप्टेंबर २०२४ रोजी मरीयमपूर येथे स्थानांतरण करण्यात आले.१५ सप्टेंबर २०२६ रोजी ती होली क्रॉस बाल शिक्षण केंद्र अमरावती येथून न सांगता निघून गेली.ती नागपूर येथे पोलीसांना आढल्यानंतर शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आले.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday