राज्य स्तरीय शालेय स्पर्धेत दमदार कामगिरी,स्वरा कोंडेची कांस्यपदकासह उत्कृष्ट कामगिरी
विलास खाजोने/
दिनांक९
चांदुर बाजार -
येथिल शिवरुप कॉम्बॅक ग्रुपच्या कु.काव्या देविलाल शर्मा हिने छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत १७वर्षे वयोगटात दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावत आपली राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे.त्याच गटातील कु.स्वरा अजय कोंडे हिनेही उत्कृष्ट खेळ दाखवून कांस्यपदक प्राप्त केले आहे.या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे चांदुर बाजार परिसरात आनंदाचे वातावरण असुन त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवरुप कॉम्बॅक गृपकडून मे २०२३ पासुन मुलामुलींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे (प्रशिक्षण) दिल्या जात आहे.यामध्ये वुशू,किक बाक्सिंग, कराटे, ज्युडो व मार्शल आर्ट आदीच्या माध्यमातून आत्मविश्वास, शिस्त व स्व संरक्षण करण्याची क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे.योग्य प्रशिक्षण व नियमित सराव यामुळे विद्यार्थी विविध स्पर्धांसाठी तयार केले जात आहे.काव्या शर्मा व स्वरा कोंडे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
संत गुलाबराव महाराज भक्तिधाम परिसरात या दोन्ही खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी शिवरुप काम्बाक्ट गृप चे मुख्य प्रशिक्षक मुकेश भोयर, मुन्ना बंगालचे प्रशिक्षक हे नियमित व निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे.कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी सतिश मोहोड सचिव भक्तिधाम तर प्रमुख पाहुणे प्रमोद राऊत एक.पी.आय.परतवाडा, राजेश वानखडे, डॉ राहुल अहिर,अजय लव्हाळे, निलेश देशमुख,अजय चारथळ, सचिन आंबुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अशोक तागडे तर
