अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत आज शुक्रवारी, दि. 9 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, मंत्री डॉ. सामंत यांचे शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता विमानाने अमरावती विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. के. जी. देशमुख सभागृहात राज्य मराठी विकास संस्था आणि विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मंत्री डॉ. सामंत नागपूरकडे प्रयाण करतील.
