वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री. बालमुकुंद राठी विद्यालयाचे घवघवीत यश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 2, 2026

वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री. बालमुकुंद राठी विद्यालयाचे घवघवीत यश




रुपाली खंडारे हिचे सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


शिरजगाव कसबा दिनांक ३

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):

        विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित विभागीय स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री. बालमुकुंद राठी विद्यालय, शिरजगाव कसबा येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध वजनी गटांत पदके पटकावून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.

स्पर्धेत ८६+ किलो वजनी गटात रुपाली मधुकर खंडारे हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक (Gold Medal) मिळविले आहे. तिची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

५८ किलो वजनी गटात खुशी देवानंद पारिसे व धनश्री विनोद सातपुते यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. तसेच ६३किलो वजनी गटात जानवी अनिल सातपुते व लक्ष्मी रमेश अमझरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक (Bronze Medal) प्राप्त केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थिनींना लाभलेले मार्गदर्शन, सराव व मेहनत यामुळे हे यश संपादन करता आले. विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा संघ व्यवस्थापक ज्ञानेश्वर  नवलकर यांचे मार्गदर्शन व परिश्रम या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच प्रशिक्षकांचेही मोलाचे योगदान लाभले आहे.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. विजयजी राठी , सचिव  प्रशांतजी राठी , संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश सुरडकर , ज्येष्ठ शिक्षक  काळे , हेडा  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थिनी, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या रुपाली खंडारे हिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages