‘महा-उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांसाठी सेवा अधिक सुलभ व पारदर्शक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, October 11, 2026

‘महा-उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांसाठी सेवा अधिक सुलभ व पारदर्शक



 

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : वित्त विभाग आणि संचालक, लेखा व कोषागारे यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात मंगळवारी, दि. 6 ऑक्टोबर रोजी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली.

 

जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ‘महा-उपलब्धी’ ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेत सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग यांचे प्रतिनिधी तसेच सहसंचालक प्रिया तेलकुंटे, सहाय्यक संचालक पंकज शिरमाते, कोषागार अधिकारी अमोल इखे आणि सहाय्यक संचालक प्रल्हाद तुमाने उपस्थित होते.



 

यावेळी जीवन प्रमाणपत्र ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे सादर करण्याबाबत कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी मार्गदर्शन केले. प्रिया तेलकुंटे यांनी निवृत्तीवेतनधारकांना ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत अंशराशीकरणाबाबत आवश्यक माहिती, वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारे निवृत्तीवेतनातील लाभ, तसेच हयातीचा दाखला ऑनलाइन व सुलभ पद्धतीने सादर करण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

 

वरिष्ठ लेखापाल राम जाधव यांनी प्रास्ताविक केले. कनिष्ठ लेखापाल नयना सोलव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages