न्यायालयाच्या आदेशानंतरही ५० वृक्षांची कत्तल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 9, 2026

न्यायालयाच्या आदेशानंतरही ५० वृक्षांची कत्तल


कार्यकारी अभियंत्यांना व कार्यकारी अधिकारी यांस पुढील तारखेस हजर राहण्याचे आदेश 

विलास खाजोने/ चांदुर बाजार -दिनांक ९


न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही अमरावती -परतवाडा मार्गावरील शंभरवर्ष जुनी सुमारे पन्नास झाडे कापल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पि.डब्लु.डी.चे कार्यकारी अभियंता व एन.एच.ए.आय.ए.चे कार्यकारी अभियंता यांना पुढील तारखेस कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

                      चांदुर बाजार नाका ते झांसी राणी चौक परतवाडा दरम्यान ६.८० किलो मिटरचा रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी पेक्षा दुप्पट झाडे तोडण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यचा दावा हायकोर्टात दाखल केलेल्या उत्तरात करण्यात आला आहे.हायकोर्टाने स्वतः हुन दाखल केलेल्या जनहित याचिकेत कोर्टमित्र अँड.सुधिर पुराणिक यांनी २०२० मध्ये हे शपथपत्र दाखल केले होते.परतवाडा येथिल वृक्ष प्राधिकरण व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ६,१९२कि.मी.अंतरावरील २२० पैकी १४१ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती.मात्र तब्बल २९१ वृक्ष तोडण्याची गरज असल्याचे कोर्टात सांगण्यात आले होते.ही संख्या दिलेल्या परवानगीच्या दुप्पट होती

                             झाडे तोडण्याची परवानगी नव्हती 

परतवाडा नगरपरिषदच्या मुख्य अधिकार्यानी झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी दिलेली नसतांनाही कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने माहीत असुनही सुमारे शंभर वर्षे जुनी पन्नास मोठी कडूनिंबाची झाडे आधिच तोडण्यात आली आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर अवमानना याचिका दाखल करावी अशी मागणीही करण्यात येत आहे.वृक्षप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी केलेल्या पाहणीत असे दिसून आले आहे की, अनेक झाडांच्या मुळाशी मुद्दाम आग लावली रस्त्याच्याकडेची हिरवीगार झाडे जाणिव पुर्वक नष्ट केली जात असल्याची छायाचित्रे पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पुरेशी मोकळी जागा उपलब्ध करून झाडांच्या मागे लोखंडी बिम लावून दुचाकी व रिक्षासाठी ३-४ कि.मी.चा वेगळा रस्ता बनवल्यास शंभर वर्षे जुनी झाडे वाचवता आली असती असे अँड सुधीर पुराणिक यांनी कोर्टास  निवेदन केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages