अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत उमेदवार डॉ. संगीता सचिद्र शिंदे-बोंडे यांच्या अधिकृत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच राजापेठ पोलीस स्टेशनसमोर अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटनामुळे विभागातील शिक्षक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत विजयाची रणनीती आखण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यास शिक्षक चळवळीतील नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महत्त्वाच्या सोहळ्याला डॉ. वसुधा बोंडे, अंजली देव, अश्विनी गोरे, मेघा साकळे, अरुण पाठक, धीरज शर्मा, मंगेश व्यवहारे, सागर शाह, अजय केवाळे, खुलसाम सर, रावसाहेब देशमुख, गजानन बुऱघाटे, प्रवीण गुल्हाने, भेडकर सर, तुषार साकळे, पंकज मिलके, पीयूष टवलारे, हार्दिक पांडे, रुपेश मिलके, संजय लोखंडे, प्रवीण भोपट, आदित्य बरवट, अमोल आगरकर, दिनेश शर्मा, निलेश निकस, सिकंदर मनवरे यांसह अनेक पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व शिक्षक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यालय उद्घाटनानंतर उपस्थितमान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी डॉ. संगीता शिंदे - बोंडे यांच्या प्रचार मोहिमेची रूपरेषा ठरवत गावोगावी व शाळा-कौन्सिलिंगपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला. या कार्यालयाच्या माध्यमातून आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारांपर्यंत थेट संपर्क साधण्यास अधिक वेग मिळणार असून, निवडणुकीची रंगत वाढली आहे.

