'महा-उपलब्धी' ॲपद्वारे मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 25, 2026

'महा-उपलब्धी' ॲपद्वारे मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र



 

अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : वित्त विभागाच्या निर्देशानुसार निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे मोबाईल ॲप दि. 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची नवी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

ॲपच्या पहिल्या टप्प्यात पेन्शनधारकांसाठी पेंशन पेमेंट हिस्ट्री, आयकर प्रमाणपत्र, ई-पीपीओ लायब्ररी, आणि फॉर्म-16 यासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे माहे नोव्हेंबर 2026 साठी आवश्यक असणारे जीवन प्रमाणपत्र याच मोबाईल ॲपद्वारे स्वीकारणे प्रस्तावित आहे. या डिजिटल सुविधेमुळे आता निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘महा-उपलब्धी’ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. तसेच माहे नोव्हेंबर-2026 चे जीवन प्रमाणपत्र याच ॲपद्वारे सादर करून डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) अमोल इखे यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages