ब्राम्हणवाडा थडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ,दत्त गणेश मंडळ व तृतीयपंथीयावर गुन्हे दाखल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 25, 2026

ब्राम्हणवाडा थडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ,दत्त गणेश मंडळ व तृतीयपंथीयावर गुन्हे दाखल

 


विलास खाजोने/चांदुर बाजार



दिनांक २६

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

                 तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.त्या दरम्यान दत्त गणेश मंडळ,माळीपुरा यांनी नागपूर येथून पाच तृतियपंथी (नाचे ) मिरवणुकीत वाचवण्यासाठी आणले होते.त्या नृत्यांगनानी मिरवणुकीत अश्लील नृत्य केले व महिला व मुले यांना लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील हावभाव केले.यावरून पोलिसांनी त्या पाच तृतीयपंथीयासह दत्त गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

                                    यामध्ये मंडळाचे अध्यक्ष आकाश गजानन लोंदे ,अजय मनोहर खडसे ,आदित्य सुभाष इंगळे ,प्रज्वल मनोज बोडखे , अर्जुन अशोक  मांडवकर रा .सर्व ब्राम्हणवाडा थडी तसेच स्वरा शिंदे , श्रावणी माहेखळ,आईशा चव्हाण ,राजू गेडाम व भूमी इनुले यांचेवर भा.द.वी.२०२३चे कलम २९४,२९६,२२३,३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असुन ब्रा.थडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत जाधव पुढिल तपास करीत आहे.

                                 यापुढे सार्वजनिक स्थळी किंवा मिरवणुकीत असे अश्लील कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages