‘दिलखुलास’मध्ये जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांची विशेष मुलाखत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 25, 2026

‘दिलखुलास’मध्ये जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांची विशेष मुलाखत



 

            मुंबई, दि. २५: जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटायझेशन आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या विविध डिजिटल सुविधांबाबत जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे. शुक्रवार, 25, शनिवार, आणि सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7.25 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर ही मुलाखत प्रसारित होईल. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

            जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी जमाबंदी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती नवाल यांनी या मुलाखतीतून दिली आहे. याचबरोबर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होत असलेल्या सुविधा, ऑनलाइन सेवा आणि ‘ई-प्रमाण’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती तसेच जमिनीच्या नोंदींमध्ये आढळणाऱ्या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज व सेवा, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा, महसूल सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही या मुलाखतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

 

            कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील महसूल सेवा, तसेच नागरिकांनी आपल्या जमिनीच्या नोंदी नियमितपणे तपासून शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही या मुलाखतीत करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages