शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महाऊर्जातर्फे चित्रकला स्पर्धा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 18, 2026

शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महाऊर्जातर्फे चित्रकला स्पर्धा



Ø इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन



       अमरावती, दि. १९ : ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने केल्यास बचत साध्य करण्याबरोबरच पारंपारिक ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीमुळे उद्भवणारे दुष्परिणाम टाळता येणे शक्य आहे. ह्यासाठी ऊर्जा बचतीबाबत सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. ऊर्जा बचती विषयीची जाणीव शालेय विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांमध्ये व्हावी या उद्देशाने ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गट 'अ' तसेच आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गट 'ब' नुसार वर्गवारी करून ऊर्जा बचतीसंदर्भात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गट ‘अ’ आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी गट ‘ब’ असे दोन गट करण्यात आले आहेत. ‘शाळेत आणि घरात ऊर्जा बचत’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन हीच ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली आहे’ हे चित्रकलेचे विषय आहेत. अमरावती विभागातील शिक्षण विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागांनी त्यांच्या अधिनस्त शाळांच्या स्तरावर हि स्पर्धा आयोजित करून आपल्यामार्फत निवड झालेल्या प्रत्येक (गट 'अ' व 'ब') गटातील दोन उत्कृष्ट चित्रे नोडल अधिकारी श्री. सुधीर मुधाई, विभागीय महाव्यवस्थापक (एच.आर.), एनटीपीसी-डब्ल्यूआर-१ एचक्यू, समृद्धी व्हेंचर पार्क, रा मजला, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ मो. नं. ९४१८०४८९६६/७५४२९०९१४८ यांच्याकडे १५ ऑक्टोबर पर्यंत पाठविण्यात यावीत. असे सुचित करण्यात आले आहे.

          ऊर्जा दक्षता ब्यूरो यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शालेयस्तरावरील ५० उत्कृष्ट चित्रांची निवड करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष स्थळावर चित्र काढण्यासाठी १४ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी बोलविण्यात येईल. गट 'अ' व 'ब' मधील राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकविणारे विजेते राष्ट्रीयस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी दिल्लीला ११ डिसेंबर २०२६ रोजी आमंत्रित करण्यात येतील.

           राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व २० हजार रुपये, तर १० उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये आहेत. राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १ लाख, ५० हजार व ३० हजार रुपये, तसेच १० उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १५ हजार रुपये आहेत.

          विजेत्यास “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन” १४ डिसेंबर २०२६ निमित्त आयोजित समारंभास मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पारितोषिके प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेबाबतच्या नियम, अटी व शर्तीची सविस्तर याबाबतची संपूर्ण माहिती www.paintings.beeindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विभागातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी (शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी) या कार्यक्रमात सहभाग घेऊन ऊर्जा संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक (प्र) अभिजीत र. हिंगे यांनी केले आहे.

 


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages