नांदगावपेठ ते वलगाव चौपदरी रस्त्याची कामे उत्कृष्ट करा - मंत्री शिवेंद्रराजे भोसले - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 12, 2026

नांदगावपेठ ते वलगाव चौपदरी रस्त्याची कामे उत्कृष्ट करा - मंत्री शिवेंद्रराजे भोसले

 


 

 

रस्त्याची केली पाहणी

 

 

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : शहराच्या बाहेरील भागांना जोडणारा व वाहतूक कोंडी कमी होवून आर्थिक विकासाला गती देणारा नांदगावपेठ टोलप्लाझा ते वलगाव या चौपदरी रस्त्याची कामे गुणात्कदृष्ट्या उत्कृष्ट करण्याचे निर्देश, आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.


 

            या निर्माणाधीन  रस्त्याच्या तोमोय शाळे शेजारील कामाची पाहणी करून मंत्री श्री. भोसले यांनी  माहिती जाणून घेतली. आमदार सुलभा खोडके, राजेश वानखडे, संजय खोडके, प्रवीण पोटे, सार्वजनिक बांधकाम अमरावती प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे, अधीक्षक अभियंता रावबहादूर पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 




                        राज्य महामार्ग-47 अंतर्गत नांदगावपेठ टोलप्लाझा-कठोरा-तोमोयशाळा-रेवसा-वलगाव या जवळपास 7 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कार्य  केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) सुरु आहे. अभियांत्रिकी, सामग्री खरेदी व बांधकाम (ईपीसी) तत्वावर तयार होत असलेल्या या  रस्त्याची पाहणी करून येत असलेल्या अडचणींची माहिती मंत्री श्री. भोसले यांनी जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या. अमरावती शहर व लगतील गावांच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या या रस्त्याची कामे गुणात्मकदृष्ट्या उत्कृष्टपणे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.

            तत्पूर्वी, मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते तोमोय शाळे शेजारील निर्माणाधीन चौपदरी रस्त्याच्याकडेला पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages