यवतमाळ
9/9/2026
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल राळेगाव येथे करण्यात आले होते ..स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात बाजी मारली. वयोगट 19 या अंतर्गत अश्विन अरविंद पाटील व ध्रुप भास्कर मांडवकर यांनी प्रथम स्थान पटकावले. एकूण 16 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
वयोगट 17 मुले या अंतर्गत वेदांत अजय येडे, तन्मय नरेंद्र महल्ले यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम स्थान प्राप्त केले. 22 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
आगामी यवतमाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अश्विन पाटील धृप मांडवकर आणि वेदांत येडे तसेच तन्मय महल्ले यांची निवड झालेली आहे.
जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल शंकर गुलाबराव मालखेडे शाळेचे क्रीडाशिक्षक आणि प्राचार्य डॉ. मंजुषा सागर यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले .विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय निवड झाल्यामुळे समस्त स्मॉल वंडर चे शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .पालक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
