अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले आज शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यानुसार, मंत्री श्री. भोसले हे दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मागील 'सारथी' इमारतीच्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर वलगाव-रेवसा-कठोरा-नांदगावपेठ रस्ता काँक्रीटीकरण करणे कामाची आणि राजकमल चौकातील बडनेरा-अमरावती रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाची पाहणी करतील. दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.