जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 1, 2026

जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 




अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्रिलला प्रवेश परीक्षा

 

अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये  शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईल अर्ज करता येणार असून शनिवार, 10 एप्रिल 2027 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

         इच्छुक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय समितीच्या navoday.gov.in संकेतस्थळावर‍ किंवा इयत्ता 11 वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_11 आणि इयत्ता 9वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_9 अधिकृत संकेतस्थळावर नि:शुल्क अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी -विद्यार्थीनी ही अमरावती जिल्हयातील रहिवासी व याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेतून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 10 आणि इयत्ता 8वीत क्रमश: इयत्ता 11 वी व 9वीच्या प्रवेशासाठी अध्ययनरत असणे आवश्यक आहे. 9वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2012 ते ३१ जुलै २०१४ आणि १० वी प्रवेशाकरिता १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान असावा. आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जन्म तारखेची अट सारखीच आहे.अधिक माहितीसाठी navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधता येणार आहे.   

                                                   

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages