अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत अमरावती शहरातील आदिवासी मुलांच्या तीन वसतिगृहांच्या मंजूर क्षमतेमध्ये वाढ झाल्याने नवीन सुसज्ज इमारतीसाठी भाडेतत्वावर येत्या सात दिवसात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
गाडगेनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 1च्या मंजूर क्षमतेत वाढ होवून 100 विद्यार्थी झाली आहे. राठीनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 2 ची विद्यार्थी क्षमता वाढून 125 झाली आहे आणि दस्तुरनगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 3 ची क्षमता वाढून 180 झाली आहे. या तिन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या निवासासाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज इमारत भाडेतत्वाने घेणे आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास कक्ष, कार्यालय, संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, स्टोअर रूम, वैद्यकीय कक्ष, शौचालय व स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ तसेच आवश्यक फर्निचर व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.
ही इमारत अमरावती शहाराच्या मध्यवर्ती व शैक्षणिक परिसराच्या जवळ असावी. इच्छुक इमारत मालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयात किंवा अमरावती येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख किंवा गृहपालास कार्यालयीन वेळेत येत्या सात दिवसात कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास धारणी कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी (वसतीगृह) यांनी केले आहे.