रिद्धपूर स्कूल व्हॅन अपघात नंतर प्रशासनाला जाग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 1, 2026

रिद्धपूर स्कूल व्हॅन अपघात नंतर प्रशासनाला जाग

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचा दणका 

प्रत्येक स्कूल व्हॅन मध्ये महिला सेविका बंधनकारक


अमरावती  दि.२:- (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील स्कूल बस अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला सेविका (अटेंडंट) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे एका ६ वर्षीय चिमुकलीचा (ईश्वरी ठाकरे) स्कूल वाहनाच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेची दखल घेत 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, अमरावती जिल्हा' यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आक्रमक भूमिका घेतली. संघटनेने अमरावतीचे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि आरटीओ अधिकारी यांना तातडीने निवेदन देऊन स्कूल बसेसमध्ये महिला वाहक/सेविका असण्याची मागणी केली होती. 
तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूरबाजारचे वतीने  तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर, बाबाराव खडसे केंद्रीय कार्यालय प्रमुख, रुपेश फरकुंडे विदर्भ कार्यकारणी सदस्य, गौतम खंडारे तालुका कार्यकांरनी सदस्य व इतर पदाधिकारी समवेत जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) व शिक्षणाधिकारी  माध्यमिक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले होते.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या या यशस्वी पाठपुराव्यानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख (जिल्हा परिषद, अमरावती) यांनी २७/०८/२०२६ रोजी (जा.क्र. ४५५१/२०write) अन्वये जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळांना कडक आदेश जारी केले आहेत.
 महिला सेविका बंधनकारक: जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी स्कूल बसमध्ये एक महिला सेविका (अटेंडंट) असणे आता सक्तीचे आहे.
GPS प्रणाली आवश्यक: सर्व बसेसमध्ये जीपीएस (GPS) ट्रॅकिंग सिस्टीम कार्यरत असणे आवश्यक आहे.
पोलीस पडताळणी (Police Verification): स्कूल बसच्या वाहन चालकाची पोलिसांकडून संपूर्ण चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
शाळांना इशारा
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही पूर्णपणे संबंधित शाळेची जबाबदारी राहील. या शासकीय आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांना यापुढे सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, असा थेट आणि कडक इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages