विशेष सखोल पुनरीक्षणाला सहकार्य करावे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

विशेष सखोल पुनरीक्षणाला सहकार्य करावे

 


*राजकीय पक्षांना आवाहन

 

 

अमरावती, दि. ६ : जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत 3 लाख 95 हजार मतदारांनी आवश्यक असलेला फॉर्म भरून दिलेला नाही. परीणामी मतदारयादीतून हे मतदार वगळले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार शोधून त्यांच्याकडून फॉर्म जमा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शिबीरे आयोजित करण्यात आली. बीएलओंकडून स्वगणना करण्यासाठी अर्ज वितरीत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही 3 लाख 95 हजार मतदारांनी हे फॉर्म भरून दिलेले नाही. फॉर्म भरून परत देण्याची मुदत 8 ऑगस्ट आहे. तोपर्यंत फॉर्म भरून दिले नसल्यास मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीमधून वगळले जाणार आहे. प्रारूप मतदारयादीवर आक्षेप घेतला येणार आहे, तसेच मतदारयादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

 

प्रामुख्याने मतदार मयत, स्थलांतरण किंवा इतर कारणामुळे संबंधित भागात आढळून येत नाही. त्यामुळे त्यांची नावे वगळली जाणार आहेत. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदारयादीमध्ये नाव नसल्यास मतदारांनी नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करावी. यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages