भारताच्या तिरंगा ध्वजाची निर्मिती कोठे होते.....? - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 19, 2026

भारताच्या तिरंगा ध्वजाची निर्मिती कोठे होते.....?


नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा आनंद सर्वांनी अनुभवला.....

दिल्ली च्या लाल किल्ल्यावर आणि भारतातील सर्व प्रमुख ठिकाणी तिरंगा डौलाने फडकतांना बघून अभिमान वाटत होता....

देशाचा गौरव असलेला हा तिरंगा नेमका कोठे तयार केल्या जातो ह्याबद्दलची जिज्ञासा स्वाभाविक आहे.....

स्वामी रामानंद तीर्थ आणि पद्मभूषण गोविंदभाई श्राफ यांच्या पुढाकाराने १९६७ ला महाराष्ट्रातील नांदेड येथे तिरंगा ध्वज निर्मिती केंद्राची स्थापना झाली......

लातूर येथील कोर्या सुती कापडाला अहमदाबाद ( गुजरात ) येथील मान्यताप्राप्त मिलमध्ये तीन रंगांत छपाई केल्या जाते.....

ह्याच कापडाला अंतिम रूप नांदेड येथे दिल्या जाते.....यासाठी २०० कारागिर सतत वर्षभर कार्यरत असतात...

देशातील जवळपास १६ राज्यांना नांदेड येथून तिरंगा ध्वजाची निर्यात केली जाते.....

नांदेड येथील कारागिरांना उदरनिर्वाहाचे उत्तम माध्यम असलेल्या _

१० हजार तिरंगा ध्वजाची वर्षाला निर्मिती केली जाते.....आणि यामधून १ कोटी रुपयांची उलाढाल होते.

वेगवेगळ्या कमी अधिक आकाराचे तिरंगा ध्वज निर्माण करणार्या ह्या केंद्राने __२१ फूट लांब आणि १४ फूट रुंद असलेला तिरंगा ध्वज निर्माण करून __अनोखा विक्रम केला


संकलन -

नानासाहेब देवतळे

 शिरसगाव कसबा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages