स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक

 


१५ सप्टेंबर अर्जाची अंतिम मुदत

 

अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये समाज कल्याण विभागाने महत्त्वाचा बदल केला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांना आता प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

 

      विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यासच विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. जे विद्यार्थी शासकीय  वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा तसेच शासकीय वस्तीगृह योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज नोंदवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आर.व्ही. जाधवर यांनी केले आहे.

 

     अधिक माहितीसाठी  सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती. तसेच ई-मेल आयडी: speldswo_amt@rediffmail.com 

दू.क्र. 0721-2661261 वर संपर्क साधता येणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages