पात्र लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परताव्यांचे वितरण सुरु - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

पात्र लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परताव्यांचे वितरण सुरु


अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  अण्णासाहेब  पाटील आर्थिक  विकास महामंडळाच्या विविध योजनांकरिता  आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्पीय तरतूदीचा निधी प्राप्त झाला असून अमरावती जिल्ह्यासह राज्यातील पात्र लाभार्थी आणि उद्योजकांचे प्रलंबित व्याज परताव्यांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

        अण्णासाहेब  पाटील आर्थिक  विकास महामंडळाने व्याज परताव्याची प्रकरणे निकाली काढण्यासाठी वर्ष २०२६-२७ करिता ७५० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली . याअंतर्गत व्याज परताव्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने शासनाकडे ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमीत करुन ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे २१ कोटींच्या व्याज परताव्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित पात्र व प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही सुरु असून लवकरच व्याज परताव्याची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती अण्णासाहेब  पाटील आर्थिक  विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.

                     

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages