कर्जमाफीची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

कर्जमाफीची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नवीन पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे  अग्रणी जिल्हा व्यवस्थापक  नरेश हेडाऊ  यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या शेतीविषयक खर्चासाठी वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून कर्ज खात्याची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून नवीन पीक कर्जासाठी अर्ज करावा. पात्रता व बँकेच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनीही त्वरित कार्यवाही करावी असे अशी सूचना श्री. हेडाऊ यांनी केली आहे.

                                         

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages