स्वाधार योजनेच्या नुतनीकरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

स्वाधार योजनेच्या नुतनीकरणासाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा  सन २०२५-२६ या वर्षात लाभ घेतलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी  अर्जाचे ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर  १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण अमरावतीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

नूतनीकरण अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आणि चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत  करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी अर्ज नूतनीकरण केला होता किंवा प्रथम वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करून लाभ मिळवला होता, ते सर्व  विद्यार्थी या नूतनीकरणासाठी पात्र आहेत.

            ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आणि तपासणीसूचीनुसार आवश्यक सर्व कागदपत्रे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. नूतनीकरण अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात असे सांगण्यात आले आहे.

                

 

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages