वैभव अभ्यंकर यांचा उल्लेखनीय यशप्रवास
अमरावती, दि. 06 : राहुल नगर, अमरावती येथील रहिवासी वैभव अभ्यंकर यांनी भारतातील नामांकित दिल्ली विश्वविद्यालय येथून सन 2023 ते 2026 या कालावधीत एलएलबीचा (विधी पदवी) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि अनेक आव्हानांचा सामना करत वैभव अभ्यंकर याने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. "गल्ली ते दिल्ली" असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत आहे.
दिल्लीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी केवळ अभ्यासातच उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जागरूक, अभ्यासू आणि समाजाभिमुख विद्यार्थ्याची भूमिका निभावत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये तसेच सामाजिक व शैक्षणिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
या यशाबद्दल त्यांची आजी गोकर्णबाई वकीलराव अभ्यंकर, जिजा वसंतराव तसरे, वडील दादा अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, आई वंदना दादा अभ्यंकर, वीणा अभ्यंकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच परिसरातील वरिष्ठ इंजि. सुशील गुडदे, इंजि. संजय ढवळे, नितीन आठवले (फार्मासिस्ट), सतीश दादा गवई, कलेश कांबळे, राजेंद्र गवई, सिद्धार्थ गुडदे, विजय वानखडे, मोहन इंगळे, प्रा.अरुणा तसरे (राऊत), रुपेश सरदार, देवेन ढोके, विजय दांडगे सर, पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, इंजि. अनिल बागडे, अमोल अडेकार, विजय लव्हाळे,सचिन बनसोड, सागर वानखडे, चेतन अभ्यंकर तसेच मानवता बुद्ध विहार व परिसरातील नागरिकांनी वैभव अभ्यंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वैभव अभ्यंकर यांचे हे यश अमरावती शहरासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या कर्तृत्वामुळे इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.