वन वैभव कॉलनीत श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

वन वैभव कॉलनीत श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

 अमरावती, ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क : 



वन वैभव फॉरेस्ट कॉलनी गृहनिर्माण संस्था अंतर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त दि. १९ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला.


सप्ताहभर ह.भ.प. श्री गणेश गिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्री ज्ञानेश्वरी पारायण झाले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त पारायण पूर्ण करणाऱ्या भाविकांना त्यांच्या शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वितरण करण्यात आले. सप्ताहाची सुरुवात ह.भ.प. श्री भरत रेळे महाराज यांच्या समाजप्रबोधनपर सप्त खंजिरी कीर्तनाने झाली. तसेच श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, शेंदोळा (बु.) व विविध भजन मंडळांनी दररोज सायंकाळी भजनसेवा सादर करून परिसर भक्तिमय केला.


दि. २५ जुलै रोजी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी माऊलींची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पालखी मार्ग रांगोळ्या व फुलांनी सजविण्यात आला होता. पालखीचे ठिकठिकाणी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले. त्यामुळे वन वैभव परिसरात जणू पंढरपूर अवतरल्याचा भाव निर्माण झाला.
रविवार, दि. २६ जुलै रोजी सप्ताहाची सांगता ह.भ.प. श्री गणेश गिरी महाराज यांच्या काला कीर्तनाने झाली. या कीर्तनाला मृदंगाचार्य विक्रमभाऊ काठोडे व हार्मोनियमवादक मनोजभाऊ झाडे यांची सुरेल साथ लाभली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन वन वैभव फॉरेस्ट कॉलनी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भारसाकडे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत पुसदकर, सचिव श्री रमेश बोके तसेच श्रीहरी ग्रुपचे अध्यक्ष श्री संजय गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुनील काकडे, श्री गडपल्लीवार, श्री कोल्हे, श्री पातोंड, श्री अमृतकर, श्री बानुबाकोडे, श्री संजय भारसाकडे व मित्रपरिवार, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजन मंडळ तसेच परिसरातील महिला व युवकांनी तन-मन-धनाने मोलाचे सहकार्य केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages