सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन


अमरावती, दि.६ : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच उद्योजकांना सुलभ व जलद कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने  येत्या 7 ऑगस्ट  रोजी  सकाळी 11 वाजता एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन हॉल अमरावती येथे  देशव्यापी एमएसएमई कर्ज वितरण शिबीराचे आयोजन  करण्यात आले आहे.

 

या विशेष कर्ज मेळाव्यात नवउद्योजक, विद्यमान उद्योग, व्यापारी, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तसेच एमएसएमई  क्षेत्रातील सर्व पात्र उद्योजकांना विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असून, कर्ज प्रस्तावांचे मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची तपासणी तसेच पात्र अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी  तसेच  उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उद्योजकांनी आवश्यक कागदपत्रांसह या कर्ज मेळाव्यास उपस्थित राहून बँकेच्या आकर्षक एमएसएमई  कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय यांनी केले आहे.

                                           

 


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages