अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): ईद-ए-मिलाद, कावड यात्रा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहिहांडी, पोळा, गणपती उत्सव कालावधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चिन्हीत व आक्षेपार्ह गाणे व भडकाऊ भाषणांच्या क्लिप्स वाजविण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.