आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते 'आधार सेवा केंद्राचे' उद्घाटन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 14, 2026

आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते 'आधार सेवा केंद्राचे' उद्घाटन

 

 


अमरावती, दि.१५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या आधार सेवा केंद्राचे काल आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शहरातील हे आधुनिक आधार सेवा केंद्र नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल आणि 'डिजिटल इंडिया'चे स्वप्न साकार करण्याच्या आणि राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे आधार सेवा केंद्र व्यवस्थापक अनिल मराठी आणि सेवा पुरवठादार संस्था मेसर्स बीएलएस इंटरनॅशनलचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 


या नवीन आधार सेवा केंद्राला दुपारी खासदार  बळवंत  वानखडे यांनी भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी स्वत:च्या बायोमेट्रिक माहितीचे अद्ययावतीकरण  करून घेत  या प्रक्रियेतील सुलभता समजून घेतली.


 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्या भारती कॉलेज रोड वर दम्मागी येथे नव्याने सुरु झालेले हे आधार सेवा केंद्र आठवडाभर सुरू राहणार असून नवीन आधारकार्ड नोंदणी,  5 ते 17 वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि थेट तक्रार निवारणाची सुविधा येथे उपलब्ध असेल.सेवांचे एकसमान दर्जेदार मानक, मजबूत डेटा सुरक्षा आणि वेळेवर तक्रार निवारण सुनिश्चित करण्यासाठी युआयडीएआयद्वारे सर्व आधार सेवा केंद्रे चालवली जातात.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages