18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 14, 2026

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा


 

अमरावती, दि १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अमरावतीच्या एनएसएस हॉल मध्ये येत्या 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

             या मेळाव्यात पुणे जिल्ह्याच्या बारामती येथील पिआजिओ वेहिकल्स प्रा.लि. कंपनी तर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व आयटीआयमधील फिटर,वेल्डर,पेंटर,सीट मेटल वर्कर अभ्यासक्रम उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडेटा व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक तथा मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.

                                                  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages