'महाडीबीटी 2.0' पोर्टलवर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 14, 2026

'महाडीबीटी 2.0' पोर्टलवर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू

 

            पालक आणि मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 

अमरावती , दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अनुसूचित जाती  प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 'महाडीबीटी २.०' या नवीन प्रणालीवर मॅट्रिकपूर्व योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विलास मरसाळे  यांनी केले आहे.

 

'महाडीबीटी २.०' अंतर्गत पाच प्रमुख शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात यामध्ये  इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिकपूर्व शिक्षण फी व परीक्षा फी प्रदान योजनांचा समावेश आहे.

 

महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करताना शाळांसाठी  मुख्याध्यापकांचे फक्त एकच लॉगईन उपलब्ध असेल, ज्या शाळांना अद्याप लॉगईन व पासवर्डबाबत अडचणी असतील, त्यांनी तातडीने आपल्या संबंधित शैक्षणिक विभागाशी संपर्क साधावा असे सांगण्यात  आले आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही शाळांच्या मुख्याध्यापकांनी वेळेत पूर्ण करायची आहे. https://mahadbt२.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.  संकेतस्थळाच्या मुख्य पानावर "नागरिकांसाठी लॉगईन" किंवा "महाआयडीशिवाय प्रवेश करा" या पर्यायाचा वापर करून 'आधार बेस लॉगईन करण्यासाठी शाळा व संस्था' हा पर्याय निवडावा. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर करावा असेही सांगण्यात आले आहे.

                                                               

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages