अमरावती, दि. 11 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त अमरावती येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह (125 जयंती) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थीनींना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी उत्तपन्नाचा दाखला,मागील वर्षाची गुणपत्रिकेची छायाप्रत ,जात प्रमाणपत्र व बोनाफाईड सर्टिफीकेटची आवश्यकता असून वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता व ड्रेसकोड भत्ता, सहल आदी सुविधा पुरविण्यात येतात.
0 Comments