मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 11, 2026

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन


अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org संकेतस्थळावर  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात ऑफलाईन स्वरूपात 15 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन  सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती जिल्हा आणि विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह  कार्यालयाने केले आहे.       

            वसतिगृह प्रवेश  वर्ष 2026-27 नुसार 7 ऑगस्ट  ते 15 सप्टेंबर 2026 दरम्यान  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची यादी  22 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ७२१-२६६१२६१ वर संपर्क साधता येणार आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages