नालंदा अभियान कॅम्पस उभारणीसाठी समाज सहभागाचा संवाद कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 8, 2026

नालंदा अभियान कॅम्पस उभारणीसाठी समाज सहभागाचा संवाद कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी


अमरावती,  : नालंदा अकॅडमी, वर्धा यांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या 'नालंदा अभियान कॅम्पस' या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पासाठी समाजाचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने "नालंदा कॅम्पस उभारणीत समाजाचा सहभाग – एक संवाद" या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता संबोधी हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीम टेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रमेश कटके, OSD, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन हाऊस (निवृत्त), अमरावती हे राहणार असून नालंदा अकॅडमीचे संस्थापक मा. अनुप कुमार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी मा. अनिल भटकर व बीएसएनएल, अमरावतीचे उपमहाप्रबंधक मा. विवेक वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
गेल्या १३ वर्षांपासून नालंदा अकॅडमीने हजारो ग्रामीण, वंचित व पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य केले आहे. सध्या वर्ध्याजवळील वायफड येथे सुमारे ९.१५ एकर परिसरात नालंदा अभियान कॅम्पस उभारणीचे काम सुरू असून या प्रकल्पाची संकल्पना, आतापर्यंतची प्रगती, भविष्यातील नियोजन तसेच समाजाच्या आर्थिक व सामाजिक सहभागाबाबत या कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या या शैक्षणिक उपक्रमाला समाजाचा व्यापक पाठिंबा मिळावा, तसेच नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संवाद साधावा, असे आवाहन आयोजक नालंदा अकॅडमी, वर्धा यांनी केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages