गुणनियंत्रण विश्लेषणात जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे 189 नमुने अप्रमाणित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

गुणनियंत्रण विश्लेषणात जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे 189 नमुने अप्रमाणित


बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरोध जिल्ह्यातून 2 हजारांवर तक्रारी;

 

कंपनी विरोधात एफआयआर दाखल

 

 

अमरावती, दि.२९ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*) : सोयाबीन बियाण्यांच्या विश्लेषणासाठी जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून 17 ऑगस्ट पर्यंत यातील 189 नमुने अप्रमाणित आढले आहेत. यासंदर्भात बियाणे उत्पादक कंपनीवर कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांची दखल घेण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या एकूण 3 हजार 157 प्राप्त तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

            विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच कंपन्यांवर कार्यवाही करण्याविषयी वृत्तपत्रांमध्ये विविध वृत्त प्रसारित झाले होते. याची कृषी विभागाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्यांचे वितरकनिहाय,वाणनिहाय,लॉट निहाय माहिती आदी सादर करण्याचे आदेश बियाणे उत्पादक कंपन्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची पाहणी विहित वेळेत होण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या. या समित्यांमार्फत प्रातिनिधिक स्वरुपात कंपनीनिहाय आणि लॉटनिहाय तक्रारींची पाहणी सुरु असून उर्वरीत तक्रारींची पाहणी उपसमित्यांद्वारे करण्यात येत आहे. 17 ऑगस्ट पर्यंत  घेतलेल्या जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून यातील 196 नमुने प्रमाणित तर 189 नमुने अप्रमाणि आढले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्यांवर बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

            एकूण प्राप्त झालेल्या 3 हजार 157 तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या  गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑॅगस्ट 2026 रोजी कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी व इतर कंपनींविरुद्ध एकूण 41 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध 10 गुन्हे तर ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीवर 5, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीवर ५, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 2, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक 1, रवि सिड्स ७, एस. के. बी सिड्स 2, ग्रिन ॲग्री रिव्होल्युशन 2, व्हिगर बायोटेक 2, अंकुर सिंड्स 2, ईगल सिड्स 1, श्री. ओसवाल सिड्स 1 आणि उत्तम सिड्सवर 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागाकडून तपास सुरु आहे.

 

             सोयाबीन बियाण्यांच्या तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 17 ऑगस्‍ट 2026 पर्यंत ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीच्या 273, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीच्या 119, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 103, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक कंपनीच्या 671, रवि सिड्स कंपनीच्या 182, एस. के. बी सिड्सच्या 45 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कंपन्यांचे बियाणे विक्री  परवान्यांवर  बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव निविष्ठा व गुण नियंत्रक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages