खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत


 

34 हजार 462 मेट्रीक टन युरीयाचा पुरवठा खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार नाही

 

अमरावती, दि. २९ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*) :  खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत झाला असून 12 ऑगस्ट 2026 पर्यंत 34 हजार 462 मेट्रीकटन (मे.ट.) युरिया, 10 हजार 270 मे. ट. डिएपी, 5 हजार 374 मे.ट. एमओपी, 45 हजार 799 मे.ट. संयुक्त खते आणि 20 हजार 526 मे. ट. एसएसपी खतांचा पुरवठा झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून युरीया  व  डिएपी खतांच्या तुटवडयाबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. खरीप हंगामात खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात आजपर्यंत कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

            जिल्ह्यात एप्रिल महिन्यात खतांच्या रॅक लागण्यास विलंब झाला मात्र लवकरच पुरवठा सुरळीत करण्यात आला. रासायणीक खतांच्या किमंतीत कोणतीही वाढ झाली नाही. विशेषत: केंद्र  शासन युरीयाच्या किंमती नियंत्रीत करीत असल्याने त्याच्या किंमतीत दरवाढ झालेली नाही. तसेच डिएपीच्या किमंतीत वाढ नाही. फोस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या बाबतीत केंद्र शासनाचे पोषणतत्व आधारीत अनुदान लागू असल्याने किंमतीत वाढ झाली नाही. संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सर्व रासायणीक खतांच्या किंमतीत सरसकट प्रति बॅग 125 ते 300 रुपयांनी वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

  खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्‍ठा रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा स्तरीय भरारी पथक स्थापन करुन कृषी सेवा केंद्रांची नियमीत तपासणी करण्यात आली. लिंकींग व तत्सम तक्रारींबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार निवारणासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये क्यु.आर.कोड आणि बियाणे,खते व किटकनाशक संदर्भातील तक्रारींकरिता व्हाट्सॲप लावण्यात आला.

 

https://adozpamravati.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-O-padding.html ब्लॉगवर जिल्ह्यातील कृषी केंद्र निहाय उपलब्ध खत साठा बघण्याची सोय करून देण्यात आली.  

             

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages