"एसटी प्रवाशांना मोठा झटका; राज्यात आज मध्यरात्रीपासून १३.५६% भाडेवाढ लागू!" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, July 18, 2026

"एसटी प्रवाशांना मोठा झटका; राज्यात आज मध्यरात्रीपासून १३.५६% भाडेवाढ लागू!"


दि.१८ :-

खिशाला कात्री! आजपासून एसटी तिकिटांचे दर वाढले; लांब पल्ल्याचा प्रवास महागणार

 महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) बसेसच्या तिकीट दरांमध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) १३.५६% भाडेवाढ मंजूर केली असून, हे नवीन दर १८ जुलै २०२६ च्या मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात लागू झाले आहेत. 

या निर्णयामुळे राज्यातील ५५ लाखाहून अधिक दैनंदिन प्रवाशांच्या खिशाला मोठा कात्री बसणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री आणि MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की महामंडळाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती: 
 आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली मोठी वाढ.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध महागाई आणि इतर भत्त्यांमध्ये झालेली वाढ.
गाड्यांचे सुटे भाग (Spare Parts), टायर आणि एकूणच देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ. 
 १०% हंगामी भाडेवाढ रद्द
सर्वसामान्य प्रवाशांना काहीसा दिलासा देण्यासाठी, साध्या बसेसवर यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी (सीझनल) भाडेवाढ आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आधीच्या वाढीव दराऐवजी आता थेट नवीन १३.५६% भाडेवाढीनुसार नवीन तिकीट आकारले जाईल.
तिकिटांचे दर आता '५ रुपयांच्या पटीत'
सुट्ट्या पैशांवरून वाहक (कंडक्टर) आणि प्रवासी यांच्यात होणारे रोजचे वाद मिटवण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व तिकीट दर ५ रुपयांच्या पटीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुट्या पैशांची कटकट जाणवणार नाही. 
🚌 प्रमुख मार्गांवरील नवीन अंदाजित तिकीट दर
या दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रमुख मार्गांवरील तिकिटांचे दर अंदाजे १५ ते ७५ रुपयांनी वाढले आहेत: 
प्रवास मार्ग (Route)जुने भाडे (रु.)नवीन भाडे (रु.)
मुंबई ते सोलापूररु. ७०५रु. ८००
मुंबई ते सातारारु. ४९८रु. ५५५
मुंबई ते कोल्हापूररु. ७३०रु. ७५५
पुणे ते सोलापूररु. ४५४रु. ४८०
नाशिक ते पुणेरु. ४१०रु. ४२५
मुंबई (दादर) ते पुणे (स्वारगेट) - शिवनेरीरु. ४५०रु. ५२५
( शिवनेरी एसी बसच्या प्रवासासाठी आता प्रवाशांना ७५ रुपये अधिक मोजावे लागतील.) 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages