शुक्रवारी शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी 'एनपीएस संचय' जनजागृती कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 2, 2026

शुक्रवारी शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी 'एनपीएस संचय' जनजागृती कार्यक्रम


अमरावती, दि. २  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अग्रणी जिल्हा बँक सेल - सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विशेष ‘एनपीएस संचय आउटरीच प्रोग्राम’ हॉटेल गौरी इन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे आणि ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांवर केंद्रित असणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील असंघटित आणि वंचित घटकांपर्यंत, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लहान उद्योजकांपर्यंत पेन्शन योजनेचा लाभ पोहोचवणे हा या 'एनपीएस संचय' योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय वाढीस लागेल.

आउटरीच कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबद्दल व्यापक जनजागृती आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणे आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख घटकांना एकत्र आणून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या घटकांना हक्काची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभाग आणि संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, एफपीओ फेडरेशन, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बँक सखी, तसेच धन फाउंडेशन आणि क्रिसिल फाउंडेशनच्या क्षेत्रीय चमूसह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 150 हून अधिक प्रमुख प्रतिनिधींना पेन्शन योजनेची माहिती आणि महत्व पटवून दिले जाणार आहे. हे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन योजनेचा प्रसार करणार आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages