चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळवली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 2, 2026

चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळवली




 अमरावती, दि.02  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून आजूबाजूचे जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात चिखलदरा येथे येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा-चिखलदार मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी जारी केले आहे.

याकारणास्तव 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत नंतरचे दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडा वरून चिखलदरा जाणारी वाहतुक ही परतवाडा वरून धामणगांव गढी मार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल तसेच चिखलदरा वरून परतवाडा परत येणारी वाहतुक ही चिखलदरा वरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावातील स्थानिक नागरिकांना रस्ते वाहतुक वळविण्याच्या आदेशात सुट देण्यात येत आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages