दिनांक: 23 जुलै 2026
अमरावती, दि. 23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी उपायुक्त संतोष कवडे, सहायक आयुक्त वैशाली पाथरे , नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.