महाराष्ट्र वाहतूक नियम: काळजी घ्या, नियम पाळा आणि दंड टाळा! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 30, 2026

महाराष्ट्र वाहतूक नियम: काळजी घ्या, नियम पाळा आणि दंड टाळा!


दि, ३० :-


 महाराष्ट्रात सर्व वाहनांना वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन विभाग आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तुम्ही नियम पाळल्यास तुम्हाला कोणताही दंड होणार नाही. 

HSRP नंबर प्लेट अनिवार्य 
 १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक आहे.
 ही नंबर प्लेट नसल्यास ₹१,००० चा दंड आकारला जात आहे.
 HSRP नसलेल्या वाहनांच्या आरटीओ (RTO) सेवा (जसे की वाहन ट्रान्सफर, लायसन्स नूतनीकरण) खंडित केल्या जात आहेत. 
 ५-स्ट्राईक पॉलिसी 
एका वर्षात कोणत्याही चालकाने ५ पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई केली जाईल.
५ वेळा नियम तोडल्यास चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द केले जाईल. यामध्ये सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे अशा लहान चुकांचाही समावेश आहे. 
PUC च्या नियमांत मोठे बदल 
६ वर्षांपर्यंत जुन्या खाजगी BS6 वाहनांसाठी पीयूसी (PUC) प्रमाणपत्र आता दरवर्षीऐवजी ३ वर्षांतून एकदाच काढावे लागेल, असा नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे.
 जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या (BS1, BS2, BS3) वाहनांना आता दर ३ महिन्यांनी PUC चाचणी करणे बंधनकारक असेल.
सीटबेल्ट आणि हेल्मेट: सीटबेल्ट न वापरल्यास किंवा हेल्मेट न घातल्यास ₹१,००० दंड.
चालू गाडीवर मोबाईल वापरणे: वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलल्यास ₹२,००० दंड.
मद्यपान करून वाहन चालवणे (Drunk Driving): ₹१०,००० दंड आणि लायसन्स निलंबन.
वेग मर्यादा ओलांडणे (Over-speeding): पहिल्या गुन्ह्यासाठी ₹१,००० ते ₹२,००० पर्यंत दंड. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages