अमरावती, दि. १ : पाणी फाऊंडेशन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या सहकार्याने सन २०२६-२७ साठी शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.
दि. २५ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या डिजिटल शेतीशाळेत कापूस, सोयाबीन, तूर, खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, भात, मका, नाचणी, घेवडा (राजमा), तूर-मूग-उडीद तसेच भाजीपाला आदी पिकांबाबत कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आणि कृषि विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडून मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे. या माध्यमातून पीक नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण केले जाते.
डिजिटल शेतीशाळेच्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार दर सोमवारी बा
या उपक्रमासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर या संस्था ज्ञानसहभागी म्हणून सहभागी आहेत.
डिजिटल शेतीशाळेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करण्यात यावी. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकानुसार संबंधित ऑनलाइन सत्रात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.