10 ऑगस्ट रोजी विभागीय महिला लोकशाही दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 31, 2026

10 ऑगस्ट रोजी विभागीय महिला लोकशाही दिन

 

        अमरावती, दि. 1 : शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार तसेच महिला व बाल विकास विभागाच्या दि. 4 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी, अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. असे आवाहन अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन)  संजय जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

          प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर, तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

          तरी विभागीय महिला लोकशाही दिनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी विहित नमुन्यातील तक्रार अर्ज लोकशाही दिनाच्या किमान 15 दिवस आधी दोन प्रतींमध्ये सादर करावा. तसेच तक्रार अर्ज आवश्यक कागदपत्रांसह dcgamravati@gmail.com अथवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवरही विहित नमुन्यात पाठविता येईल. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages