शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://krishi.maharashtra.gov.
अमरावती, दि. १ : राज्यात अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा आयोजित करण्यात येते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, यावर्षी प्रथमच स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या स्पर्धेत विभागातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक डॉ. प्रशांत नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
पीकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून प्रशासनालाही स्पर्धेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
या स्पर्धेत सर्वसाधारण तसेच आदिवासी गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. तालुका स्तरावरील उत्पादकतेच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एकाच शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग लागवडीचे क्षेत्र असणे बंधनकारक आहे.
अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक खाते किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आवश्यक आहे.
मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ असून, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम तारीख आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी प्रति पीक प्रवेश शुल्क ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तसेच राज्य स्तरावर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.