दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 31, 2026

दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू


*पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती दि. 1 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी बुधवार, दि. 5 ऑगस्ट रोजी पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी सकाळी 10 ते दुपारी 2.30 यावेळेत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीचे नाव व पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages