ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 31, 2026

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ




अमरावती, दि. 1 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत मानधन मंजूर करण्यात येते. यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्विकारण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 1 जुलै 2026 पासून आपले सरकार पोर्टलवर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे, मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता दि. 15 ऑगस्टपर्यंत पात्र साहित्यिक आणि कलावंतांना अर्ज करता येणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages