'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 28, 2026

'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत'



जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन

अमरावती, दि.२८ : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत' उपक्रमांतर्गत 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्याभारती महाविद्यालयात होणार आहे.

या अभियानाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि 'विकसित भारत' उभारणीत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविणे आहे.

स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत, सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, लघुपट, रील निर्मिती, घोषवाक्य लेखन, मौखिक काव्य सादरीकरण आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांचे विषय व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली आणि विकसित भारताशी संबंधित असतील. जिल्हास्तरीय स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अधिक माहितीसाठी माय भारत, अमरावती जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'माय भारत'चे जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages