अमरावतीत 'एनपीएस संचय आउटरीच' कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

अमरावतीत 'एनपीएस संचय आउटरीच' कार्यक्रम संपन्न


           


 
अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पी.एफ.आर.डी.ए. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अग्रणी बँक कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हॉटेल गौरी इन येथे 'एनपीएस संचय आउटरीच' कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी नाबार्डच्या रश्मीता पंचाळे, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सचिन राठी, रघुवीर सिंह चरण, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा अधिकारी प्रदीप चेचरे, माविमचे डॉ. रंजन वानखडे, अभिनंदन बँकेचे विजय बोथरा, शिवाजी देठे, बँक ऑफ महाराष्ट्राचे रवी जैन, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सार्थक सोनटक्के आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना मुख्य अतिथींनी 'एनपीएस संचय' योजनेबद्दल माहिती दिली. एनपीएसमधील नियमित गुंतवणूक ही एखाद्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर सन्मानाचे जीवन जगण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच म्हणून कशी काम करते, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पीएफआरडीएचे राहुल यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर चालक आणि उपस्थितांसाठी संवादात्मक सत्राचे नेतृत्व केले, ज्यामध्ये नागरिकांनाही थेट सामावून घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुनील पांडे यांनी केले. तर आभार जिल्ह्याचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी मानले.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages