टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी 24 जुलै रोजी अमरावतीत ‘पेन्शन अदालत’ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 17, 2026

टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी 24 जुलै रोजी अमरावतीत ‘पेन्शन अदालत’

;

23 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांच्या वतीने टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी  11 वाजता विशेष 'डाक पेन्शन अदालत' चे आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत अमरावती येथील प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालतमध्ये टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाईल, ज्यांची महाराष्ट्र आणि गोवा राज्य स्तरावर 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, मात्र वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढवणे, धोरणात्मक बाबी तसेच शिस्तभंग आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या पूर्णपणे कायदेशीर प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांनी आपली तक्रार केवळ वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नसावी) विहित नमुन्यातील अर्जाच्या तीन प्रतींसह प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती (444602) या पत्त्यावर दिनांक 23 जुलै 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी; मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही, असे डाक विभागाकडून कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages