अमरावतीत विशेष लोकअदालत 18 जुलै रोजी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 16, 2026

अमरावतीत विशेष लोकअदालत 18 जुलै रोजी

 कलम 138 च्या प्रलंबित प्रकरणांचा होणार जलद निपटारा

अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  न्यायप्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवून 'न्याय आपल्या दारी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने शनिवार, दिनांक 18 जुलै 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आयोजित या लोकअदालतीमध्ये परकाम्य संलेख अधिनियम, कलम 138 (N.I. Act 138 - चेक बाऊन्स प्रकरणे) अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून पक्षकारांना वेळेत दिलासा मिळावा आणि परस्पर संमतीने व सलोख्याने हे वाद तात्काळ मिटवता यावेत, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे.

            या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपापसांतील प्रलंबित प्रकरणांचे सलोख्याने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांनी केले आहे.

 


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages